शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! लग्नसमारंभातही चोरट्यांचा शिरकाव; वधू पक्षाकडील सहा लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:53 IST

पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे

पुणे: विवाह समारंभातून चोरट्यांनी रोकड, तसेच दागिने असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बाणेर भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबरला बाणेर परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यांनी एका टेबलवर गडबडीत पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड आणि मोबाईल असा ऐवज होता. चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे पुढील तपास करीत आहेत.

सोन्याची बांगडी लांबवली...

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. त्या विश्रांतवाडी भागातून धानोरीकडे निघाल्या होत्या. विश्रांतवाडीत बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करून लांबविली.

डेअरीतून रोकड लांबविली..

डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ९२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना धायरी भागात घडली. याबाबत एका तरुणाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात डेअरी आहे. चोरट्यांनी २६ नोव्हेंबरला मध्यरात्री डेअरीचे कुलूप तोडले. गल्ल्यातील ठेवलेली रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलिस कर्मचारी मोरे तपास करीत आहेत.

पादचारी तरुणाला धमकावून मोबाइल हिसकावला..

पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शुक्रवारी (दि. २८) सकाळी सहाच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाला धमकाविले. त्याच्या खिशातील ५० हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला.

English
हिंदी सारांश
Web Title : Thefts plague Pune: Wedding, bus, shop, pedestrian targeted by thieves.

Web Summary : Pune sees a rise in thefts. Six lakhs stolen from a wedding. A gold bangle snatched from a bus passenger. A shop and pedestrian also robbed. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेjewelleryदागिनेGoldसोनंfraudधोकेबाजीThiefचोरcctvसीसीटीव्ही