"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:28 PM2021-09-21T21:28:40+5:302021-09-21T21:33:22+5:30

शिवसेना नेत्यांच्या मागणीवरून लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला आदेश दिले जाणार आहेत

"Benefit of Punyadasham bus service will be easier, Aadhar card condition for travel will be canceled" | "पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार"

"पुण्यदशम बससेवेचा लाभ सुलभ होणार, प्रवासासाठी आधार कार्डची अट रद्द करणार"

Next
ठळक मुद्दे प्रवास करताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले होते अन्यथा बस मधून उतरवले जात असे

 पुणे : पीएमपीएलच्या पुण्यदशम बससेवेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आधारकार्डची अट रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मंगळवारी मुख्यसभेत केली. त्यावर यासंदर्भात लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला आदेश दिले जातील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

महापालिकेने नागरिकांनी खासगी वाहने वापरणे कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, वाहतुक कोंडी कमी करावी आणि नागरीकांना कमी पैशात प्रवास करता यावा, यासाठी  पीएमपीएलच्या सहकार्याने मध्यवर्ती शहरात १० रुपयांत दिवसभर प्रवास ही योजना सुरू केली आहे. ' पुण्यदशम ' नावाने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी ५० एसी मिनी बसेस खरेदी केल्या आहेत. मध्यवर्ती शहरात १० रुपयांमध्ये दिवसभर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र हा प्रवास करताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

आधारकार्ड नंबर दिल्यानंतरच तिकीट दिले जाते, अन्यथा बस मधून उतरवण्यात येते. त्याबाबत सातत्याने शिवसेनेने आवाज उठविला आहे. सर्वसाधारण सभेत पीएमपीएलच्या प्रस्ताव चर्चला आला असताना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रवासादरम्यान आधारकार्डचे बंधन काढून टाकावे अशी मागणी केली. नागरिकांना सुविधा देताना बंधने का लादताय ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सुरवातीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि नंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात पीएमपीएमल प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. आधारकार्ड चे बंधन काढून टाकावे याबाबत त्यांना आदेश देण्यात येतील असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

Web Title: "Benefit of Punyadasham bus service will be easier, Aadhar card condition for travel will be canceled"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.