शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

लाभार्थ्यांनी कर्जमंजुरीचे पत्र आॅनलाईन सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:00 PM

अर्जदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडील अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय संस्थेकडून/ बँकांकडून या योजनेअंतर्गत शासननिर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या लॉगिन आयडीद्वारे २३ मार्च २०१८ पर्यंत आॅनलाईन सादर करावे. 

ठळक मुद्दे आनंद कटके : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना सुरू.कर्जाची कमाल मर्यादा १७.६० लाख. जिल्हास्तरीय समिती मार्फत जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्ष्यांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. 

पुणे : राज्यात जलयुक्त शिवार अभियान/जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासन मृद व जल संधारण विभाग मंत्रालयाच्या शासननिर्णय क्र. जशिअ-२०१७/प्र.क्र. ५२२/ जल-७ दिनांक २ जानेवारी २०१८ अन्वये जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उत्खनन यंत्रसामग्री (अर्थमूव्हर्स) खरेदी करण्याकरिता वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८पर्यंत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी वित्तीय संस्थांकडून कर्जमंजुरीचे पत्र प्राप्त करून घेऊन आॅनलाईन सादर करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे.कटके यांनी सांगितले, की याअनुषंगाने प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महाआॅनलाईनद्वारे एसएमएसने यादी प्रसिद्ध केल्याबाबत कळविलेले आहे. पात्र अर्जदारांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडील अधिकृत परवानाधारक असलेल्या जिल्ह्यातील वित्तीय संस्थेकडून/ बँकांकडून या योजनेअंतर्गत शासननिर्णयाप्रमाणे विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या लॉगिन आयडीद्वारे २३ मार्च २०१८पर्यंत आॅनलाईन सादर करावे. कर्जाची कमाल मर्यादा १७.६० लाख कर्जमंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, शासनाकडून अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा १७.६० लाख रूपये राहील. तसेच त्यानुसार ५ वर्षांमध्ये शासनामार्फत कमाल व्याजपरतावा रक्कम ५.९० लाख रुपयांपर्यंत राहील, अशी अट वित्तीय संस्थेला मान्य असल्याचे नमूद असावे.तसेच, वित्तीय संस्थेचे कर्जमंजुरीचे पत्र सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची संख्या लक्ष्यांकापेक्षा जास्त असल्यास शासन निर्णयात नमूद जिल्हास्तरीय समिती मार्फत जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्ष्यांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. या योजनेसंबंधी अधिक व विस्तृत माहिती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण, पहिला मजला, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत,   ५, बी. जे. रोड, पुणे ४११००१ यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे  आवाहन जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेgovernment schemeसरकारी योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक