कपात मागे; आजपासून दोन वेळ पाणी
By Admin | Updated: August 4, 2014 23:48 IST2014-08-04T23:48:56+5:302014-08-04T23:48:56+5:30
शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरण 1क्क् टक्के भरल्याने मुठा नदी आणि कालव्यातून मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.

कपात मागे; आजपासून दोन वेळ पाणी
पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरण 1क्क् टक्के भरल्याने मुठा नदी आणि कालव्यातून मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हे जादा पाणी पाटबंधारे विभागाकडून शहरासाठी देण्यात येणार असल्याने शहरात सुरू असलेली एक वेळ पाणीकपात पालिकेने आज मागे घेतली आहे. त्यामुळे उद्या (मंगळवार) पासून शहरात पुन्हा दोन वेळ पाणी देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर चंचला कोद्रे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शहराच्या पाणीपुरवठय़ाबाबत पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कोद्रे यांनी सांगितले. दरम्यान, ही कपात पुढील 1क् दिवसांसाठी मागे घेण्यात आली असून, 15 ऑगस्टपूर्वी पुन्हा एकदा धरणातील पाण्याचा आढावा घेऊन दोन वेळ पाण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रत पाऊसच नसल्याने महापालिकेने ही पाणीकपात 35 टक्क्यांवर नेत शहरात 11 जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. या वेळी या धरणांमध्ये अवघा 1.1क् टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, 12 जुलैनंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन आठवडय़ांत पाणीसाठा 1क् टीएमसीच्या घरात पोहोचला होता. त्यामुळे 25 जुलैपासून शहरात एक वेळ पाणी देण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आजअखेर या धरणांमधील पाणीसाठा 2क् टीएमसी झाला आहे. त्यामुळे ही कपात आज 1क्क् टक्के मागे घेण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 1क्क् टक्के भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी शहरास देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, आयुक्त आणि पक्षनेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दहा दिवस दोन वेळ पाणी देण्यात येणार असून, 15 ऑगस्टपूर्वी पुन्हा आढावा घेतला जाईल
- चंचला कोद्रे,
महापौर
धरण क्षेत्रंत पुन्हा जोरदार
पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रीत गेल्या तीन दिवसांपासून विश्रंती घेतलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. गेल्या चोवीस तासांत खडकवासला वगळता या प्रणालीतील वरसगाव, पानशेत, टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रीत गेल्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, या चारही धरणांतील पाणीसाठा आज 2क़्42 टीएमसीवर पोहोचला आहे.
गेल्या चोवीस तासांत धरणात तब्बल 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर, खडकवासला धरणातून मुठा नदीत सायंकाळी सहा नंतर 9 हजार 394 क्युस्केस पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर, या चारही धरणांचा पाणीसाठा 7क् टक्क्यांवर पोहोचला आहे.
दोन दिवसांची विश्रंती घेतल्यानंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रीत जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत या धरणांमध्ये तब्बल 351 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक 125 मिलिमीटर पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत झाला.
तर, वरसगाव आणि पानशेत
धरणाच्या पाणलोट क्षेत्रत
प्रत्येकी 1क्1 आणि 1क्4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, खडकवासला धरणात 21 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने धरणसाठय़ात वेगाने वाढ होत
असून, रात्री उशिरार्पयत जोरदार पाऊस सुरू होता. (प्रतिनिधी)
धरणसाठा आणि गेल्या चोवीस तासांतील पाऊस
पाऊसपाणीसाठाटक्केवारी
खडकवासला211़9398
वरसगाव1क्48़9366
पानशेत1क्17़3769
टेमघर1252़6772
एकूण3552क़्427क्
बांधकामांसाठी बोअरवेल्सचे पाणी
शहरातील एक वेळ पाणीकपात मागे घेतली असली, तरी दिवसाआड पाणीकपात लागू करताना महापालिकेने बांधकाम, जलतरण तलाव, तसेच वॉशिंग सेंटरवरील बंदी आणि हॉटेल मधील शॉवर, तसेच टबबाथ वरील बंदीही शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर ही बंदी मागे घेण्याची मागणी शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी, तसेच जलतरण तलाव चालकांनी केली होती. त्यानुसार, या सर्व ठिकाणी केवळ बोअरवेल्स, तसेच विहिरीचे पाणी वापरावे, पिण्याचे पाणी वापरू नये, या अटीवर बंदी मागे घेतली असल्याचे महापौर कोद्रे यांनी आज स्पष्ट केले.
शहराला पाणीपुरवठा करणा:या चारही धरणांमधील पाणीसाठा 2क् टीएमसी झाला आहे. तसेच, खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने त्यातून जादा पाणी कालव्यात सोडले जाणार आहे. हे पाणी बांधकामांना, तसेच जलतरण तलावांना वापरणो शक्य आहे. त्यामुळे वरील सर्व घटकांवर घातलेली बंदी मागे घेतली असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. मात्र, वरील कोणत्याही ठिकाणी पिण्याचे पाणी वापरू नये, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. तर, येत्या काही दिवसांत शहरात जलतरण स्पर्धाही होणार असल्याने खेळाडूंना सरावासाठी जलतरण तलावांची आवश्यकता असल्याने ही बंदी मागे घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बंदीही पुढील दहा दिवसच मागे घेतली असून, पाणीसाठा आढावा बैठकीनंतर याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.