शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Kanhaiya Kumar: 'भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही'; कन्हैया कुमारांचा कंगनाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 21:12 IST

सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले...

पुणे: 'भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असं म्हणत वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतला टोला लगावला आहे. स्वातंत्र्यावरील वक्तव्यावरून कन्हैया कुमारांनी (kanayya kumar) कंगनाला फटकारले. काही दिवसांपूर्वी कंगनाने भारताला मिळालेले स्वतंत्र्य भीखेत मिळाले असल्याचे म्हणाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यालाच प्रत्यूत्तर देताना कन्हैया कुमारांनी भीक मागून पुरस्कार मिळतात स्वातंत्र्य नाही म्हणत कंगनाला (kangana ranaut) टोला लगावला. पुण्यात देशातील बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर शहरात वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

काँग्रेसचे चरित्र या देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक रंगाची फुले फुलवण्याचा विचार आहे हा. या देशात अतिवाद चालत नाही. सध्या ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या असं आवाहन काँग्रेस नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, नेतृत्व तोच पक्ष करेल ज्याला देश समजेल. ज्यांनी रेल्वे नाही बनवली, ज्यांनी बीएसएनएल नाही बनवले ते एका सेकंदात या कंपन्या विकणारच. ज्यांनी बनवले तेच या कंपन्या वाचवणार. एक बडबोला माणूस अर्ध्या रात्री ऊठून बोलेल तर देश वाचणार नाही तर विकणारच. गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा, असं कन्हैया कुमार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसे काय होते? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी केला.

टॅग्स :PuneपुणेKangana Ranautकंगना राणौतMaharashtraमहाराष्ट्रkanhaiya kumarकन्हैय्या कुमार