शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

पुण्यात लॉकडाऊनमध्ये मधमाशींना मिळाले मुक्तसंचार करण्याचे 'स्वातंत्र्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:39 IST

लॉकडाऊनमुळे मधमाशांच्या वसाहतीमध्ये वाढ

ठळक मुद्देप्रजोत्पादनही चांगले ; उपनगरांमध्ये प्रमाण अधिक  

पुणे : लॉकडाऊनचा कालावधी निसर्गासाठी उपयुक्त ठरला असून, मधमाशी यांना देखील पोषकमय झाला आहे. या कालावधीत शहरात मधमाशांचे पोळ चांगल्या प्रकारे निर्माण झाले आणि त्यांना मानवी हस्तक्षेप किंवा प्रदूषणाचा त्रास झाला नाही. त्यामुळे एका कॉलनीत ८ ते ९ राणीमाशी तयार झाल्या. ज्या एरवी तीन ते चार होतात. तसेच मध देखील चांगला मिळाला अशी माहिती मधमाशीचे संवर्धन आणि अभ्यास करणारे अमित गोडसे यांनी दिली.  

लॉकडाऊनमध्ये शहरातील कोथरूड, वारजे, हडपसर, औंध, हिंजेवाडी या परिसरात पोळ अधिक प्रमाणात दिसून आले. या परिसरात फुले, फळे अधिक प्रमाणात फुलतात आणि शेतीचा भाग असल्याने मधमाशांना खाद्यही चांगले होते. मधमाशांना शंभर फुटांपेक्षा अधिक जागा पोळ तयार करायला लागते. ते या परिसरातील इमारतींवर करत असल्याचे दिसले. कारण इथे उंच उंच इमारती आहेत. गेली चार महिने मानवी हस्तक्षेप नसल्याने माशांना चांगला वावरता आले आणि एका ठिकाणी राहता आले. कारण त्यांचा त्रास नागरिकांना झाला नाही. कोरोनाची भीती मनात होती. म्हणून मधमाशांना हलविण्यासाठीही आम्हाला काँल्स आले नाहीत. अन्यथा एरव्ही खूप काँल्स येतात.कीटक किंवा इतर गोष्टींसाठी नागरिक औषध फवारणी किंवा पेस्ट कंट्रोलचा परिणाम मधमाशांवरही होत असतो. पण लाँकडाऊनमध्ये औषध फवारणी झाली नाही. ही गोष्ट मधमाशांसाठी पोषक ठरल्याचे गोडसे यांनी सांगितले.  

------------ 

लॉकडाऊनचा असाही परिणाम मधमाशापालन करणारे विजय महाजन म्हणाले, लाँकडाऊनचा मधमाशांवर चांगला परिणाम झाला. प्रदूषणरहित मध उपलब्ध झाला. पण दुसरा फटकाही बसला. कारण ग्रामीण भागात ४० पेट्या ठेवल्या होत्या. त्यांची देखरेख करण्यासाठी लाँकडाऊन असल्याने जाता आले नाही. त्यातील ३० पेट्या खराब झाल्या.''  

------------------------------ 

एसी च्या ठिकाणी धोका इमारतीमध्ये एसी लावला जातो. तेव्हा पाण्यासाठी पाइप भिंतीबाहेर काढतात. तेथील जागा व्यवस्थित बंद न केल्याने मधमाशा आता जाऊन पोळ करतात. पक्षी, कीटकांनाही ही जागा धोकादायक ठरते. म्हणून नागरिकांनी पाइप बाहेर काढल्यावर तेथील जागा पूर्ण बंद करायला हवी, अशी अपेक्षा अमित गोडसे यांनी व्यक्त केली. 

 ------------------------------------ 

कुंडीत फुलं, फळ जोपासावीत नागरिकांनी कुंडीत फुलं, फळं लावावीत. जेणेकरून मधमाशांसाठी खाद्य उपलब्ध होईल. तसेच जागा असेल तिथे तुळशी, नारळ, आंबा, जांभुळ, तूती, तामण अशी झाडं लावली पाहिजेत. त्यामुळे मधमाशांचा वावर वाढेल, असे गोडसे म्हणाले.

  --------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण