शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

किरकोळ कारणावरून मित्राच्या डोक्यात फोडली बियरची बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:57 PM

वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यातून एकाने बियरची बाटली मित्राच्या डोक्यात फोडली.

ठळक मुद्दे समीर सुर्यगंध या आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : शिवी दिल्याच्या कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. हा प्रकार शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. जयकुमार त्रिंबके (वय २९, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार समीर सुर्यगंध या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांच्या मामाच्या मुलाचा १४ एप्रिलला वाढदिवस होता. त्यानिमित्त कासारवाडी येथील द्वारकानगर या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीसाठी समीर देखील आला होता. जयकुमार आणि समीर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. पार्टी सुरु असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामध्ये जयकुमार याने समीरला शिवी दिली. त्यावरून समीरने जवळच असलेली बियरची बाटली जयकुमारच्या डोक्यात फोडली. यामध्ये जयकुमारच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPoliceपोलिस