किरकोळ कारणावरून मित्राच्या डोक्यात फोडली बियरची बाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:57 IST2018-04-16T18:57:44+5:302018-04-16T18:57:44+5:30
वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यातून एकाने बियरची बाटली मित्राच्या डोक्यात फोडली.

किरकोळ कारणावरून मित्राच्या डोक्यात फोडली बियरची बाटली
पिंपरी : शिवी दिल्याच्या कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. हा प्रकार शनिवारी रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. जयकुमार त्रिंबके (वय २९, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार समीर सुर्यगंध या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांच्या मामाच्या मुलाचा १४ एप्रिलला वाढदिवस होता. त्यानिमित्त कासारवाडी येथील द्वारकानगर या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीसाठी समीर देखील आला होता. जयकुमार आणि समीर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. पार्टी सुरु असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामध्ये जयकुमार याने समीरला शिवी दिली. त्यावरून समीरने जवळच असलेली बियरची बाटली जयकुमारच्या डोक्यात फोडली. यामध्ये जयकुमारच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.