"फिट" असल्यामुळेच पंतप्रधान मोदी संसदेत विरोधकांचा चांगला समाचार घेतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 19:25 IST2020-02-07T19:18:18+5:302020-02-07T19:25:06+5:30

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील व्यायामशाळेचे उदघाटन केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Because of fitness, PM Narendra Modi fight with opposition in Parliament ; Ramdas Athwale | "फिट" असल्यामुळेच पंतप्रधान मोदी संसदेत विरोधकांचा चांगला समाचार घेतात 

"फिट" असल्यामुळेच पंतप्रधान मोदी संसदेत विरोधकांचा चांगला समाचार घेतात 

पुणे : "आरोग्य चांगले रहाण्यासाठी सर्वांनीच नियमीत व्यायाम करावा, व्यायामाने आरोग्य चांगले रहाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नियमित योगासने करतात. त्यामुळे ते तंदुरुस्त आहेत. निरोगी व तंदुरुस्त असल्यामुळेच संसदेत मोदीजी हे विरोधकांचा चांगला समाचार घेतात, असे मिश्किल मत केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील व्यायामशाळेचे उदघाटन केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यानिमित्ताने आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत आठवले यांनी हा राजकीय टोला लावला. निरोगी आरोग्यासाठी सर्वांनीच नियमितपणे व्यायाम करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी माजी नगरसेवक, आरपीआयचे अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयुब शेख, अनिल अग्रवाल, रेणूताई अग्रवाल, आरपीआयचे शहर अध्यक्ष अशोक शिरोळे, परशुराम वाडेकर, स्वीकृत नगरसेवक संजय कदम, निलेश आल्हाट, फिरोज पठाण आदी कार्यकर्ते,नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Because of fitness, PM Narendra Modi fight with opposition in Parliament ; Ramdas Athwale