शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला जळगावचा विद्यार्थी बनला पिस्तूल तस्कर; ८ पिस्तुले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 19:20 IST

जळगावच्या विद्यार्थ्यासह चौघांना अटक 

पुणे : पुण्यात इंजिनिअरिंगसाठी आलेला तरुण पिस्तुल तस्कर बनल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशातून पिस्तुले घेऊन तो पुण्यातील गुन्हेगारांना गेली ४ वर्षे विक्री करत होता.त्याच्यासह पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांची ८ पिस्तुले आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

मुख्य सुत्रधार भूषण महेश मराठे (वय २३, रा. अरूणनगर, चोपडा, जि. जळगाव), राहुल चंद्रकांत पवार (२६), तौफीक गुलाब शेख (वय २५, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) आणि राम गोरोबा जाधव (वय ३५, रा. दांडेकर पूल, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पवार याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात ५ गंभीर स्वरूपाचे तर जाधव याच्यावर राजगड पोलिस ठाण्यात खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.

शहरात शस्त्रविक्री करणाऱ्यांचा डाटा संकलित करुन त्यांच्याकडे तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता. खंडणी विरोधी पथक दोन शहरातील पिस्तूल प्रकरणांचा डाटा संकलीत करून तपास करीत असताना पोलिस अंमलदार सचिन अहिवळे यांना माहिती मिळाली. जळगाव येथून एक जण देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी पुण्यात येणार असल्याचे समजले.

त्यानुसार पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पथकाने सापळा लावून भूषण मराठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ पिस्तुले, ६ जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो इतर आरोपींच्या संपर्कात आल्याचे सांगितले. त्याचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा गाव हे मध्यप्रदेश सीमेपासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. तेथूनच १० ते १५ हजार रूपयांना पिस्तुले विकत घेऊन तो पुणे शहरात ती पिस्तुले ३० ते ५० हजार रूपयांपर्यंत विकत होता असे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक