पुण्यातील वेल्हे तालुक्यात शिक्षकांना मारहाण; तिघांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:46 IST2018-01-08T13:45:23+5:302018-01-08T13:46:14+5:30

जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना तालुक्यातील स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्या तीन्ही आरोपींना वेल्हे पोलिसांनी अटक केली आहे.

Beating teachers in Welhe taluka of Pune; Three arrested by police | पुण्यातील वेल्हे तालुक्यात शिक्षकांना मारहाण; तिघांना पोलिसांनी केली अटक

पुण्यातील वेल्हे तालुक्यात शिक्षकांना मारहाण; तिघांना पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देवेल्हे तालुक्यातील शिक्षक वर्गामध्ये भीतीचे वातावरणआरोपींवर कडक कारवाई करण्याची वेल्हे तालुका शिक्षक समितीच्या वतीने पोलिसांकडे मागणी

वेल्हे : अतिदुर्गम वेल्हे तालुक्यात ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना तालुक्यातील स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यातील शिक्षक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
मारहाण करणाऱ्या तीन्ही आरोपींना वेल्हे पोलिसांनी अटक केली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी वेल्हे तालुका शिक्षक समितीच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध वेल्हे पोलीस ठाण्यात शिक्षक बाळासाहेब मुंढे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: Beating teachers in Welhe taluka of Pune; Three arrested by police

टॅग्स :Puneपुणे