शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाईनबॉयची दारु पिऊन महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:23 IST

दारु विक्री सुरु झाल्यापासून मारामार्‍या,भांडणांच्या घटनांमध्ये वाढ

ठळक मुद्देदारु पिऊन भांडणे, मारामार्‍यांच्या घटना वाढल्याअनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर दारु पिऊन गोंधळ घालणार्‍यांना घरी जाण्यास सांगितल्याने त्यांनी महिला पोलीस हवालदारास धक्काबुक्की करुन पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस वसाहतीसमोर रविवारीसायंकाळी साडेसात वाजता घडला. लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांची संख्या जवळपास थांबली होती. दारु विक्री सुरु झाल्यापासून दारु पिऊन मारामार्‍या,भांडण्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्ह्याव्यतिरिक्त इतर गुन्हे दाखल करण्यात येत नसल्याने ते कागदोपत्री दिसून येत नाही. सुबोध लोखंडे (वय २०), प्रकाश ऊर्फ टग्या जाधव (वय २५, रा. दोघेही विश्रांतवाडी पोलीस वसाहत) या दोघा लाईनबॉयच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्ल तसेच साथ रोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्तीव्यवस्थापन २००५ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला हवालदार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपी हे भांडण करीत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षातून त्यांना कॉल मिळाला. त्यानुसार त्या व सायप्रस बीट मार्शल घटनास्थळी पोहचले. तेव्हा लोखंडे व जाधव हे रस्त्यावर दारु पिऊन तोंडाला मास्क न लावता आढळून आले. त्यांनी दोघांना घरी जाण्यास सांगितले. तेव्हा लोखंडे हा त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने मी लाईनबॉय आहे, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून त्यांना धक्काबुक्की केली. प्रकाश जाधव याने आम्ही जात नाही तुला काय करायचे ते कर तुला बघून घेतो, असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला.लाईनबॉयने दारुच्या नशेत महिला पोलीस हवालदारासोबत धक्काबुक्की केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस वसाहतीत भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला फायटरने मारहाण करण्यात आली होती.पोलीस लाईनमधुन बाहेर जाण्यास एकच प्रवेशद्वारे उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेर जाणार्‍या व येणार्‍या सर्वांची नोंद करण्याससांगितले आहे. जे नागरिक कामाशिवाय वारंवार बाहेर जात असतील अशांचीमाहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.तरीही पोलीस लाईनमधील तरुण दारु पिऊन गोंधळ घालत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला