खंडणी नाकारल्याने हातगाडी चालकाला मारहाण; स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:00 IST2017-11-30T18:53:27+5:302017-11-30T19:00:59+5:30

खंडणी देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली.

beaten due to refuses pay tribute; Swargate police station has filed a complaint | खंडणी नाकारल्याने हातगाडी चालकाला मारहाण; स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खंडणी नाकारल्याने हातगाडी चालकाला मारहाण; स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देशंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली घटना तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : हातगाडी लावण्यासाठी खंडणी देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद उर्फ अण्णा शेलार, टिक्या शेलार व एका व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. 
अविनाश बनसोडे (वय १८, रा. आंबेगाव खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली. बनसोडे हे प्रतिक यादव यांच्या नाश्त्याच्या गाडीवर काम करतात. यातील आरोपींनी येथे गाडी लावण्यासाठी ५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्याने टिक्या आणि अन्य साथीदाराने फिर्यादीला शिवीगाळ करीत हात, पाय आणि मानेवर बांबूने फटके मारले. तसे त्याच्या खिशातील २ हजार ३०० रुपये आणि मोबाईल हिसकावून नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 

Web Title: beaten due to refuses pay tribute; Swargate police station has filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.