शेतीच्या कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:44+5:302021-02-05T05:12:44+5:30
कार टेम्पोची धडक खेड : नगरवरून पुण्याकडे निघालेल्या ट्रकला यूटर्न करत एका कारने धडक दिली, त्यानंतर कारमधील दोघांनी खाली ...

शेतीच्या कारणावरून मारहाण
कार टेम्पोची धडक
खेड : नगरवरून पुण्याकडे निघालेल्या ट्रकला यूटर्न करत एका कारने धडक दिली, त्यानंतर कारमधील दोघांनी खाली उतरून टेम्पोल चालकालाचा मारहाण केली त्यामध्ये टेम्पो चालक जखमी झाला. अबुबकर हसन शेख (वय २८, आदर्शनगर मुदलवाडी, ता. पैठण) या चालकाने याबाबत फिर्याद दिली.
ही घटना शिरूर गावाजवळीच शिरूर बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी दोघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
--
पिकाचे पैसै देण्यावरून चुलतीला मारहाण
खेड : भागिदारीमध्ये केलेल्या कोबीच्या पिकाचे पैसे दिले नाही म्हणून पुतण्याने चुलतीला काठीने मारहाण केली. ही घटना शिरोली (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी बाळू बळवंत वाळुंज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सुदरबाई ज्ञानेश्वर वाळुंज यांच्या फिर्यादीनुसार खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.