शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मालक असावा तर असा! आजारी कर्मचाऱ्याला भेटायला आले रतन टाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 20:32 IST

Ratan Tata News: पुंडलिका भेटी जणू परब्रह्म आले ! आपल्या एका माजी आजारी कर्मचाऱ्याला भेटायला ते थेट पुण्यातील त्याच्या घरी आले.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सामाजिक बांधिलकी जपणारे... गोरगरीबांसाठी धावून जाणारे... गरजूंना सढळ हाताने मदत करणारे... कोविड रुग्णालय उभारणारे... लॉक डाऊनच्या काळात कामगारांच्या पाठीशी उभे राहणारे... अत्यंत साधे, विनम्र असे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा. आपल्या या लौकिकात त्यांनी रविवारी भरच घातली.

आपल्या एका माजी आजारी कर्मचाऱ्याला भेटायला ते थेट पुण्यातील त्याच्या घरी आले. तेही कुठला बडेजाव, लवाजमा सोबत न घेता. कोथरूडमधील वूडलँड सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांना भेटायला खुद्द रतन टाटा आले, याचा पत्ताही रहिवाशांना लागला नाही. मुंबईहून दुपारी तीन वाजता पुण्यात आलेले रतन टाटा थेट इनामदारांच्या घरी गेले. दोन वर्षांपूर्वी टाटा समूहासाठी काम करणाऱ्या मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आजारी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याची टाटांनी आवर्जून भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या आजारी सहकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले.

या दोघांच्या भेटीचा फोटो सोसायटीत राहणाऱ्या एकाने ट्विटरवर टाकला. त्यामुळे सोसायटीत गर्दी होऊ लागली. पण तोपर्यंत टाटा शांतपणे निघून गेले.

विनम्रता आणि साधेपणा अनुभवलामी रविवारी दुपारी सोसायटीत परतत होतो. तितक्यात रतन टाटा गाडीतून उतरले. तेवढ्याच वेगाने ते लिफ्टमध्ये शिरले. त्यांची विनम्रता आणि साधेपणा वाखाणण्याजोगा होता. परत जाण्यासाठी ते जेव्हा पार्किंगमध्ये आले. तेव्हा मी आणि मुलगी आदिश्री त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला ध्येयावर लक्ष केंद्रित करा, असा कानमंत्र त्यांनी दिला.- अभिजित मकाशीर, अध्यक्ष,  वूडलँड सोसायटी

टॅग्स :Ratan Tataरतन टाटा