शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये ते १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:53 IST

महापालिका आयुक्तांनी काढले आदेश पुणेकरांनो,कचरा कराल तर खबरदार! ५० रुपये १० हजारांपर्यंतचा होऊ शकतो दंड

ठळक मुद्देनागरिकांना ओला, सुका आणि जैविक कचऱ्यांचे वर्गीकरण करणे बंधनकारकपाळीव प्राण्यांनी घाण केल्यास त्याला मालकाला जबाबदार धरण्यात येणार

पुणे : कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास यापुढे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून यासोबतच कचरा जाळणाऱ्यांकडूनही दंड वसुली केली जाणार आहे. पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास त्याला मालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी काढले.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार, नागरिकांना ओला, सुका आणि जैविक कचऱ्यांचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. वर्गीकरण न करता कचरा दिल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.  नियमांचे पालन केल्यास पहिल्यांदा ६० रुपये, दुसऱ्यांदा १२० रुपये तर पुढील प्रत्येक वेळी १८० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, रस्त्यावर कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, उघड्यावर शौच करणे, पाळीव प्राण्यांना लघू शंका -शौचास नेणे, नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे आणि कचरा जाळणे असे प्रकार केल्यास दंड वसुली केली जाणार आहे.या कचऱ्यासोबतच बांधकामाच्या राडारोड्याचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे हा कचरा वाहून नेण्याची आणि प्रक्रिया करण्याची यंत्रणा पालिकेने उभारलेली आहे. नागरिकांनी पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून राडारोड्यासंदर्भात माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. राडारोडा नदी वा नाल्यांचे पात्र, पदपथ किंवा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर पाच हजार आणि दुस-या वेळी साडेसात हजार तर पुढील प्रत्येक खेपेस दहा हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.========पालिकेने घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकरिता स्वच्छ संस्थेसोबत करार केलेला आहे.  स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना घरटी पैसे द्यावे लागतात. त्याला झोपडपट्टीतील नागरिकही अपवाद नाहीत. झोपडपट्टीतील प्रत्येक घरामागे दरमहा ५० रुपये शुल्क आकारण्याचे पालिका आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. सोसायट्यांसाठी ७० रपये तर व्यावसायिक आस्थापनांसाठी १४० रुपये दरमहा निश्चित करण्यात आले आहेत.========प्रकार                                                             दंडरस्त्यावर कचरा करणे                                     १८०सार्वजनिक ठिकाणी थुंकणे                               १५०उघड्यावर लघवी करणे                                    २००उघड्यावर शौच करणे                                      ५००पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास                          १८०नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे               २००कचरा जाळणा-यांकडून                                    ५००

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नcommissionerआयुक्त