शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! बनावट फेसबुक अकाऊंटवरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:42 IST

पैसे मागणार्‍या मेसेजबाबत घ्या दक्षता

पुणे : बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्याशी संबंधित मित्रांना पाठवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे फसवणूक करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे कोणाचेही पैसे पाठविण्याचे मेसेज आले तर अगोदर संबंधितांशी थेट संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

नव्या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यात अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या तब्बल २२० अर्ज सायबर पोलिसांकडे आले आहेत. गेल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत अशा १४० तक्रारी आल्या होत्या.आपण वेगवेगळ्या साईटवर आपले फोटो, माहिती अपलोड करत असतो. त्या फोटो आणि माहितीचा उपयोग करुन सायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडिल आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते. वर भारतात परत आल्यावर तुमचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन भावनिक आवाहन केले जाते. त्यामुळे अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याच्या भावनेतून तुम्ही त्याने सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात. नंतर कधी तरी ते मित्राचे बनावट अकाऊंट असल्याचे समजते. तोपर्यंत मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशा प्रकारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. ......सायबर चोरटे बनावट अकाऊंट तयार करुन त्याद्वारे होणार्‍या फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जवळच्या कोणाकडून पैशांची मागणीचे मेसेज आले असेल तर मदत करण्यापूर्वी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी. ओळखीच्या व्यक्तीकडून आलेली फे्रंड सिक्वेस्ट स्वीकारावी.राजकुमार वाघचवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.........

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसonlineऑनलाइन