शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

कोरोनाशी लढण्यासाठी मदत कराच! पण ती योग्य जागी पोहचेल याची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 11:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत निधीत साह्य करण्याचे आवाहन

ठळक मुद्देअर्धा डझन वेबसाईट बनावट : खात्री केल्यावरच ऑनलाईन पाठवा पैसे 

विवेक भुसे - पुणे : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असून, त्याच्याशी लढण्यासाठी सर्व जण लॉकडाऊनचा हत्यारासारखा वापर करत आहे. या युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची गरज भासणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत निधीत साह्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, ही मदत करताना ती योग्य जागी पोहोचेल याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर अ‍ॅट एसबीआय याची माहिती जाहीर करताना काही वेळात त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या अर्धा डझन वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या भारताच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक(एनपीसीएससी) लेफ्टनंट जनरल राजेश पंत यांनी सायबर गुन्हेगारांना कडक इशारा देताना सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी सध्याच्या कोविड -१९ या संकटाचा गैरफायदा घेऊ नये आणि आर्थिक फसवणूक न करण्याचा इशारा दिला आहे. जनरल पंत यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा बोलबाला सुरु झाल्यानंतर गेल्या २ महिन्यात कोरोना व्हायरसशी संबंधित जवळपास ४ हजार फ्रॉड पोर्टल जगभरातील सायबर गुन्हेगारांनी त्या तयार केल्या आहेत.अशा संकटाच्या काळातही सायबर गुन्हेगार संधी शोधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर या साईटची घोषणा केली. ती लोकांपर्यंत पोहचण्यापूर्वी काही वेळात त्याच्याशी साधर्म्य दर्शविणाºया अर्धा डझन वेबसाईट तयार करण्यात आल्या होत्या. सुदैवाने आमच्याकडे त्याला अडविणारी कार्यक्षम यंत्रणा आणि सीईआरटी इन सारखी संस्था आहे. तसेच अशा प्रकारच्या साईटपासून संरक्षण करण्यासाठी बँक कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत़ अनेकांची कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदत देण्याची इच्छा आहे़ ही मदत कशी देता येईल, याबाबत चौकशी करीत असतात़ अनेकांना ई मेल, मेसेज येऊ लागले आहेत़ मात्र, ते खरेच असतील याची अगोदर खात्री करण्याची आवश्यकता आहे. तसेच पीएम केअर या नावाने एक बनावट युपीआय डोमिन तयार करण्यात आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर सायबर क्राईमच्या  पोलिसांनी तो ब्लॉक केला आहे़. त्यामुळे कोणतीही मदत देताना तुम्हाला एकदा मेल अथवा मेसेज आला व त्यावरुन दिलेल्या डोमिनवर तुम्ही मदत करु नका़ कदाचित ती फेक असण्याची शक्यता आहे...........सायबर गुन्हेगार कोणती कल्पना लढवून कशा प्रकारे फसवणूक करतील, याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो़. फसवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे हजार कारणे तयार असतात. त्यामुळे आपली मदत व इतर गोष्टींसाठीही योग्य लिंकचा वापर करावा आणि आपले व्यवहार करावेत़- जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुण

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस