शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सावधान..! फेक केवायसी फाइल डाऊनलोड करताच बँक खाते झाले रिकामे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:24 IST

सावरगाव : मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील विविध सोशल मीडिया व विशेषता हॉट्सअॅप ग्रुपवर कॅनरा बँकसह इतर बॅँकेच्या फेक ...

सावरगाव : मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील विविध सोशल मीडिया व विशेषता हॉट्सअॅप ग्रुपवर कॅनरा बँकसह इतर बॅँकेच्या फेक केवायसी फाइलसंदर्भात मेसेज व्हायरल होत आहे. अनेकदा सर्व सामान्य नागरिक बँकेच्या मेसेजविषयी थोडा जागरूक असतो. आपले खाते बंद होऊ नये म्हणून ते बँकेच्या केवायसीचे फेक मेसेजला सहज बळी पडतो . सध्या अशा तीन चार घटना जुन्नर शहर व परिसरातील गावात नागरिकांच्या विषयी घडून आल्या आहेत.एका महाविद्यालयीन तसेच दुसऱ्या शाळेच्या शिक्षकांकडून नजर चुकीने ती फाइल डाउनलोड झाली. फाइल डाउनलोड होताच त्या शिक्षकाचा प्रथमता मोबाइल हॅक झाला. त्यानंतर त्या शिक्षकाच्या मोबाइल नंबरवरून इतर विविध सामाजिक व शैक्षणिक ग्रुपवर तो मेसेज प्रचंड व्हायरल झाला व शिक्षकांनी पाठविलेल्या मेसेजवर विश्वास ठेवत अनेकांनी ती बँक केवायसीची फाइल डाउनलोड केली. तर काही क्षणात त्याच्या बँके खात्यातील काही रक्कम हॅकरद्वारे काढण्यात आली. तर काही लोकांच्या लक्षात येताच त्यानी आपला मोबाइल स्विच ऑफ केला. तसेच संबंधित व इतर बँकेशी संपर्क करून आपले खाते तात्काळ बंद करण्याची विनंती त्यांना केली.संबंधित शिक्षक व फसवणूक झालेल्या तीन नागरिकांनी ऑनलाइन तक्रार पुणे सायबर सेल विभागाकडे केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया हाताळताना कोणतीही लिंक किंवा फाइल ओपन करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा स्वतःचे बँकखाते रिकामे करून बसण्याची वेळ येऊ शकते.

मागील तीन दिवसांत चार-पाच नागरिकांच्या बँक केवायसी फाइल डाउनलोड केल्याने मोबाइल हॅक होऊन बँक खात्यातून काही रक्कम परस्पर काढल्याच्या तकारी आलेल्या आहेत. अशा फसवणुकीच्या तक्रारी पुणे सायबर सेलमध्ये करण्यात आल्या आहेत नंतर पोलिस स्टेशनकडे तक्रारी करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी सावधान व जागरूक राहावे. अन्यधा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल.- मंगेश डोके, पोलिस पाटील, कुमशेत

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी