शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हा

By admin | Updated: May 9, 2017 03:32 IST

२१ व्या शतकातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे पोलिसांपुढे मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांनी सक्षम व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : २१ व्या शतकातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे पोलिसांपुढे मोठी आव्हाने निर्माण होणार आहेत. तेव्हा या आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांनी सक्षम व्हावे, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी व्यक्त केले.नानवीज (ता. दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सत्र क्र. ३८च्या दीक्षान्त संचलन समारंभात ते बोलत होते. जाधव म्हणाले, ‘‘समाजाचे रक्षण करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. तेव्हा पोलीस खात्याला काळिमा लागणार नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात प्रलोभनाला बळी पडू नका. पोलीस हा समाजाला न्याय देणार आहे. तेव्हा पोलीस होणे हे भाग्याचे आहे, कारण समाजातील प्रत्येक घटनेत पोलीस सहभागी असतो.’’प्राचार्य विजय मगर म्हणाले, की आजपावेतो १२ हजार ७९६ प्रशिक्षणार्थी या केंद्रातून प्रशिक्षत झाले आहेत. प्रशिक्षणार्थींना कायद्याचे प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम केले जाते. त्यानुसार व्यायामशाळा, वाचनालय इत्यादी सुविधा प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वेळी पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर कराटे आणि मलखांब यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सीताराम नरके, सुचित्रा तबीब यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष गांधी यांनी आभार मानले. दीक्षान्त संचलनानंतर ट्रॉफी कॉप एज्युकेशन पात बास्केटबॉल ग्राऊंड प्राचार्य कार्यालयातील सभागृहाचा उद्घाटन मान्यवरांनी केले.