शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

कोयाळी भानोबाची येथे रंगले देव-दानवांचे युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:41 AM

श्री भानोबादेवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शेलपिंपळगाव :ऐशी भानोबाची ख्याती !प्रतिवर्षी येती उत्सवासी !!भक्तिभावे पूजता त्यासी !दु:ख दैन्य निवारी !!श्रीक्षेत्र कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे रविवारी यात्रेत हजारो भाविकांनी देव-दानवांच्या युद्धाचा थरार अनुभवला. श्री भानोबादेवाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीनदिवसीय उत्सवामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी खेळले जात असलेले देव आणि दानवांचे युद्ध प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक आले होते.श्री भानोबाच्या स्वागतासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. यावेळी उत्साहात देवाचे स्वागत करण्यात आले. देवाच्या स्वागत सभारंभाला भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवारी व रविवारी देव-दानवांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली.तत्पूर्वी, रविवारी पहाटे श्री भानोबादेवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला. सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले. दोन दिवसांत एकूण १ हजार ३ भाविकांनी या युद्धात सहभाग घेतला.भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली. उत्सवात अखेरीस कुस्त्यांचा जंगी आखाडा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता. उत्सवात मनोरंजनपर कार्यक्रमाची मोठी रेलचेल ठेवण्यात आली होती.सोमवारी (दि. १०) सकाळी ६ ते ७ श्री भानोबादेवाचा ओलांडा, त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ७ श्री भानोबादेव आपल्या आजोळी प्रयाण करेल. त्यानंतर कुसेगावकरांना भावपूर्ण निरोप दिला जाईल. भानोबाच्या तीनदिवसीय उत्सवात आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, उद्योजक राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे आदींसह विविध राजकीय पक्षांच्या मुख्य पदाधिकाºयांनी हजेरी लावली होती. तीनदिवसीय चाललेला हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले. यात्रेदरम्यान आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.हजारो वर्षांची परंपरामार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पूर्वी शिवभक्त श्री भानोबादेवाला तस्करांनी कपट करून मारले होते. एक दिवस माझ्यासाठीही तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी भानोबाने दिला होता. त्यामुळे भानोबादेवाच्या शापानुसार तस्करांना आजही देवाशी युद्ध करावे लागत असल्याची आख्यायिका आहे.देव आणि तस्कर या दिनाच्या प्रतिपदेला विशेष महत्त्व असल्याने संपूर्ण राज्यातून भानोबाचे भक्त या दिवशी उपवास करून कोयाळी येथे देवाबरोबर युद्ध खेळायला येत असतात. यावर्षी पहिल्या दिवशी ४५१ व दुसºया दिवशी ५५२ जणांनी युद्धात सहभाग घेतला होता.भानोबादेव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरुपी दानवाने आपल्या हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या. मात्र देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्या क्षणी जमिनीवर पडले. दरम्यान, त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले.

टॅग्स :Puneपुणे