भांडणे सोडविणाऱ्यास बॅटने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:38 IST2018-05-07T03:38:43+5:302018-05-07T03:38:43+5:30

भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

 Baten beat those who argue the fight | भांडणे सोडविणाऱ्यास बॅटने मारहाण

भांडणे सोडविणाऱ्यास बॅटने मारहाण

विमाननगर : भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शुभम शिंदे (वय२३ रा. वडारवस्ती येरवडा) याच्याविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे त्यांच्या दारात उभे होते. समोरच शुभम शिंदे हा दोघांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता. चव्हाण यांच्या लहान भावाचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. आमच्या घरी दु:खाची घटना घडली आहे. येथे भांडणे करू नका, असे म्हणत चव्हाण यांनी त्यांची भांडणे सोडविली. या घटनेनंतर काही मिनिटांतच शुभमने परत येऊन चव्हाण यांच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. स्थानिक तरुणांनी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ला करून शुभम फरार झाला. या घटनेत चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शुभम शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Baten beat those who argue the fight