शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणीसाठी बारामतीची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 12:03 PM

क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, त्यात अधिक अचूकता आणणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.

ठळक मुद्देगाव नमुना नं.१२ मध्ये शेतकऱ्यांकडून स्वत: पीक पाहणी नोंदविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

पुणे : शेतकरी सक्षमीकरणासाठी पीक पेरणीची माहिती मोबाईलवर अ‍ॅपद्वारे घेण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पासाठी सहा महसूली विभागातून सहा तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे महसुली विभागात बारामती तालुक्याची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. गाव नमुना नं.१२ मध्ये शेतकऱ्यांनी स्वत: पीक पाहणी नोंदविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन कवी मोरोपंत नाट्यगृहात करण्यात आले होते. प्रकल्प सल्लागार टाटा ट्रस्टचे नरेंद्र कवडे, ई फेरफारचे राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे रामदास जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, गट विकास अधिकारी प्रमोद काळे यावेळी उपस्थित होते.क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, आकडेवारीत अधिक अचूकता आणणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंद करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा सहभाग असल्याने विश्वसनीय पीक माहिती हाती येईल. त्याच्या आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल. त्यामुळे पीक विमा योजनांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता येईल. तसेच, पीक विम्याचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. पिकांची आपत्तीमुळे हानी-नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेने मदत करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांना हवामान, किडींचा प्रादूर्भाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी तातडीने संदेश देणे शक्य होईल. या उपक्रमामुळे शासकीय पातळीवर देखील निर्णय आणि नियोजन करण्याची प्रक्रिया जलद होणार आहे.          

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीFarmerशेतकरीonlineऑनलाइनagricultureशेती