शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:26 IST

मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

बारामती : लोकसभेप्रमाणेच देशात लक्षवेधी ठरलेली बारामती विधानसभा मतदारसंघातील काका-पुतण्याची 'हाय व्होल्टेज' लढत अखेर मतदान यंत्रात बंद झाली. मतदारसंघात पवारांच्या काैटुंबीक आरोप-प्रत्यारोपांनी निवडणुकीचे रण चांगलेच तापल्याचे चित्र पाहावयास मिळाले. प्रथमच उदयास आलेली राजकीय समीकरणांचे पडसाद मतदानावर उमटल्याचे पाहावयास मिळाले. २३ नोव्हेंबरला या लढतीचा फैसला होणार आहे. २०१९ मध्ये लोकसभेचे ६८.२८ टक्के मतदान झाल्याचे चित्र होते. यंदा संपूर्ण मतदारसंघात हेच मतदान  ७ १ .५ ६  झाले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मतदानात एवढी घट झाल्याचे चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. त्याचा परिणाम सकाळच्या मतदानावर दिसून आला. सकाळी ९ पर्यंत अवघे ६.२० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत १८.८१ टक्के मतदान झाले. दुपारी १ पर्यंत ३३.७८ टक्के, ३ वाजेपर्यंत ४३.५७ टक्के मतदानाची टक्केवारी होती. ५ वाजेपर्यंत हेच मतदान ६२.३१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. त्यामध्ये १ लाख २२ हजार ५३६ पुरुष मतदारांनी, तसेच १ लाख १४ हजार ६३५ महिला मतदार,तसेच ९ तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत  ७ १ .५ ६   टक्के मतदान झाले.दरम्यान, २०१९ च्या तुलनेने हे मतदान चांगलेच ७ १ .५ ६ आहे. त्यामुळे ७ १ .५ ६   मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, कोणाला फटका बसणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. माळेगाव येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आदींसह मतदान केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीत मतदान केंद्रावर पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह मतदान केले. त्यांचे पुत्र जय पवार यांनी जळोची येथे मतदान केले.त्यानंतर स्वत: पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय पवार हे बारामतीत मतदारसंघात दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी शहरातील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार, त्यांचे वडील श्रीनिवास पवार, मातोश्री शर्मिला पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. युगेंद्र पवार यांच्यासह त्यांचे वडील आणि मातोश्रींनी बारामती मतदारसंघात सर्वत्र भेट देत आढावा घेतला.दरम्यान,उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह युगेंद्र यांनीदेखील आशाताई पवार यांचे मतदानापूर्वी आशीर्वाद घेतले. आजच्या लढतीत विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या निकालाचे परिणाम पवार कुटुंबीयांच्या राजकारणाबरोबरच बारामतीवरदेखील उमटणार आहेत.२३ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणारबारामतीत महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून आमच्या कार्यकर्ते यांना दमदाटी केल्याचा आरोप केला.येथील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेच्या मतदान केंद्रावर हायव्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील या आरोपानंतर या मतदान केंद्रावर पोहोचले.त्यांनी हा आरोप फेटाळला. मात्र,बारामतीच्या इतिहासात पवार कुटुंबीयांमध्ये या प्रकारचे आरोप-प्रत्याराेप झाल्याचे बारामतीकरांनी अनुभवले. प्रत्येक वेळी एकमेकांच्या हातात हात घालून निवडणुकीला सामाेरे जाणारे या कुटुंबाने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून बदललेले हे चित्र विधानसभेत देखील दिसून आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारSupriya Suleसुप्रिया सुळे