शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभचे पाणी बारामती-पुरंदरला मिळणार  : पाटबंधारेचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 07:00 IST

राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या निर्णयाची २६ वर्षानंतर अंमलबजावणीखडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा

- विशाल शिर्के पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला या पुढे उजनी धरणातून पाणी घ्यावे लागणार आहे. राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती. शेतकऱ्यांनी ही बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिल्यावर खडकवासला अभियंत्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे मंडळाने दिले आहेत. त्यामुळे कुरकुंभचेपाणी बारामती-पुरंदरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे बारामती, शिरुर आणि पुरंदर या भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. जनाई-शिरसाई योजने अंतर्गत बारामती परिसराला योग्य पाणी मिळावे अशी याचिका बारामतीमधील शेतकरी विठ्ठल जराड आणि इतर पाच शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीत विवरण अधिकाऱ्यांनी जनाई-शिरसाई योजनेला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा संपूर्ण लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  दरम्यान, जनाई शिरसाई योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी ३.६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला उजनी धरणातून पाणी देण्याचे आदेश राज्यसरकारने ९ सप्टेंबर १९९३ रोजी दिले होते. मात्र, अजूनही त्यांना, खडकवासला धरणाच्या काल्यव्यातूनच पाणी दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी पाटबंधारे मंडळाच्या लक्षात आणून दिले. तसेच, हे पाणी बंद करुन ठरल्याप्रमाणे आम्हाला पाणी द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जनाई शिरसाई योजनेच्या लाभधारकांनी त्याबाबतचा शासकीय निर्णय २७ मे रोजी लक्षात आणून दिला. त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे मंडळाने या निर्णयाच्या अमंलबजावणीचे आदेश दिले आहेत. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा प्रणालीतून पाणी दिले जाते. जनाई-शिरसाईच्या अवर्षणग्रस्त भागाला पाणी उपलब्ध होण्यासाठी यानंतरची कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची गरज उजनी जलाशयातून भागविण्यात यावी. संबंधित संस्थेस एक महिन्याची नोटीस देऊन ही बाब लक्षात आणून द्यावी. त्यानंतर संबंधित संस्थेचा पाणी वापर उजनी धरणातून करण्याचे निर्देश द्यावेत असे आदेश पुणे पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता नं. व्यं. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. २८) दिले आहेत.खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा आहे. जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तर, शिरसाई योजनेचा एक टप्पा बारामती व दौंड तालुक्यातील सिंचनासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :KurkumbhकुरकुंभWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती