शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune| बारामतीच्या ‘पीएसआय’ने अडकवले महिलेला प्रेमाच्या जाळ्यात; पतीची ‘एसपी’कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 16:56 IST

या महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०१० साली झाला आहे...

बारामतीबारामतीच्या एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेलाच प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिचा संसार अडचणीत आणल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला हातपाय मोडण्याची भाषेचा वापर केल्यानंतर संबंधित पतीने पोलीस अधिक्षकांना संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार करीत सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात दाखल तक्रार अर्जामध्ये पतीने नमूद केले आहे की, बारामती तालुक्यातील एका गावात हे कुटुंब वास्तव्यास आहे. या महिलेचा विवाह २२ ऑगस्ट २०१० साली झाला आहे. या दांपत्याला दोन मुली आहेत. जुन २०२१ मध्ये संबंधित महिला आणि पतीच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. कौटुंबिक वाद झाल्यानंतर तक्रारीचा तपास ‘त्या’ ‘पीएसआय’कडे सोपविण्यात आला होता. तो निर्माण झालेला वाद कागदोपत्री तडजोडीने संपविण्यात आला.

मात्र, त्यानंतर त्या अधिकाऱ्याने यातील तक्रारदार महिलेचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक मिळविला. ती महिला स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याची माहिती त्या अधिकाऱ्याला मिळाली होती. तिला यासाठी लागेल ती मदत देण्यात आश्वासन देत त्या अधिकाऱ्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. महिलेने पतीकडे ‘एमपीएससी’ करण्याचा हट्ट केला. त्यामुळे पतीने तिला परवानगी दिली. नोव्हेंबर २०२१ मध्ये पतीने त्याच्या पत्नीला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरी सोडले. काही दिवसानंतर सदर महिलेने कुटुंबाशी संपर्क तोडायला सुरूवात केली.

हातावर त्या पीएसआयच्या नावाचा कोरलेला टॅटु तिने पतीला दाखविला. पत्नी व फौजदार यांच्यात काहीतरी वेगळेच सुरु असल्याचा संशय आल्यानंतर पतीने पत्नीच्या आई-वडीलांना हा प्रकार सांगणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने पतीला फोनवरुन हातपाय तोडायची धमकी देत, त्याच्या पत्नीला सोडून द्यायला सांगितले. ‘मी तिला माझ्या कंपनीत १० टक्के भागीदार करणार आहे, तुला काय करायचे ते कर, अशी त्या अधिकाऱ्याने पतीला धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

याबाबत अतिरीक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाल्याचे सांगत चौकशी सुरु असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचे देखील मोहिते म्हणाले.दरम्यान, संबंधित फौजदार तक्रारदार पतीस फोनवरुन हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याची व पत्नीला दहा टक्के भागीदार करणार असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. रक्षकच भक्षक बनल्याची तक्रार झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामतीMaharashtraमहाराष्ट्र