शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती कारखान्याच्या राजकारणात ट्वीस्ट; पवार जाचकांच्या मनोमिलनातून बिनविरोध निवडणुकीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:43 IST

उपमुख्यमंत्री पवार आणि जाचक यांच्या  उपस्थित रविवारी दुपारी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

बारामती - भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा निवडणुक कार्यक्रम नुकताच जाहिर झाला  आहे. येथील शेतकरी कृती समितीचे नेते पृथवीराज जाचक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  या निवडणुकीत आव्हान देण्याच्या तयारीत हाेते.त्यातच येथील राजकारणात नवा आणि मोठा ‘व्टीस्टट’ आल्याने बिनविरोध निवडणुकीचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री पवार आणि जाचक यांच्या  उपस्थित रविवारी दुपारी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी उपमुख्यमंत्री  पवार याबाबत नव्याने घोषणा करणार आहेत. भवानीनगर येथे दुपारी १ च्या सुमारास पवार यांचे हेलीकाॅप्टरने आगमन होणार आहे.यावेळी पवार जाचक यांच्या उपस`थितीत शेतकरी आणि सभासदांशी संवाद साधणार आहेत. यांचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे.२००३ मध्ये कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाच्या काळात डावलले जात असल्यााच्या भावनेतून पृथवीराज जाचक अजित पवार यांच्यापासून दुर झाले होते.त्यानंतर जाचक यांनी भाजपमधून त्यावेळी थेट शरद पवार यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती.त्यानंतर जाचक हे राष्ट्रवादीपासून अंतर राखुन होते.२०२० मध्ये जाचक यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी चर्चा होवून समेट घडला.२०२० च्या गळीत हंगामापासून छत्रपती कारखान्याच्या महत्वपुर्ण निर्णयात कारभारात जाचक यांनी लक्ष घातले.मात्र,आॅक्टोंबर २०१२१ मध्ये संचालक मंडळ आणि जाचक यांच्यात वाद झाला.या कारखान्यात अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो.त्यामूळे संचालक मंडळाबरोबर मतभेद झाल्यानंतर जाचक पुन्हा उपमुख्यमंत्री पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यापासून दुर झाले.तसेच लोकसभा,विधानसभा निवडणुकीत देखील जाचक यांनी त्यांच्यापासून अंतर राखणे पसंत केले.तसेच जाचक यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडुन सत्तेचा गैरवापर सुरु असून सर्वोच्य न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर तिसर्याच दिवशी येथील राजकारणाचे चित्र बदलत आहे.सहकारातील अभ्यासू आणि जाणकार नेते म्हणुन जाचक यांची ओळख आहे.त्यामुळे अडचणीतील छत्रपती कारखान्याला  पुर्ववैभव प्राप्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार नविन राजकीय खेळी करणार असल्याचे बोलले जाते.तसेच जाचक यांच्या पुढील भुमिकेवरच ‘छत्रपती’च्या बिनविरोध निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती