- किरण शिंदे बारामती - बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तसेच सर्व धर्मीयांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी झाले आहेत. बारामती शहरातील शिवाजी महाराज उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली, असून सदर मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गे भिगवन चौक येथे येणार असून या ठिकाणी निषेध सभा होणार आहे.
यावेळी, माध्यमांशी बोलतांना धनंजय देशमुख यांनी लवकरात लवकर कृष्णा आंधळेला शोधून त्याला शिक्षा दिली पाहिजे. अशी मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलतांना चारसीट बाबत धनंजय देशमुख म्हणाले, 1578 पानाचे ते चारसीट आहे. त्याचा सर्व अभ्यास होणं वकिलाला आणि आम्हाला अवघड गोष्ट आहे.दोन-चार दिवसात तपास होण कठीण गोष्ट आहे. पण जो राहिलेला भाग आहे तो सप्लीमेंट्री चारसीट मध्ये काय काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.