शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Baramati: छेडछाड व बदनामीच्या धमकीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 20:05 IST

बारामती तालुक्यातील शिवपुरी (सोनकसवाडी) येथे २८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली....

माळेगांव (पुणे) : वारंवार होणारी छेडछाड व बदनामीच्या धमकीला कंटाळून अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती तालुक्यातील शिवपुरी (सोनकसवाडी) येथे २८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार लक्ष्मण महानवर, लक्ष्मण बाबा महानवर, सिंधुबाई लक्ष्मण महानवर, नवनाथ दादा महानवर सर्व (रा. शिवपुरी, सोनकसवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तुषार महानवर हा फिर्यादीच्या मुलीला १ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत वेळोवेळी त्रास देत होता. तसेच त्याने २७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीच्या घरात येऊन छेडछाड करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र, आरोपींनी तुषार यास समजावून सांगण्याऐवजी फिर्यादीच्या मुलीचीच बदनामी करू अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने घराच्या पत्र्याच्या खोलीत लोखंडी चॅनलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक तुषार भोर करीत आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंग