शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी

By नितीन चौधरी | Updated: June 4, 2024 09:55 IST

बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले....

पुणे : मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरीस सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) पिछाडीवर पडल्या आहेत. पवार यांना फक्त खडकवासला मतदारसंघातून लीड मिळाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून पवार यांना ५११ मतांची आघाडी मिळाली तर इतर पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीअखेरीस बारामती लोकसभा मतदारसंघातून सुळे यांनी ११ हजार ५३२ आघाडी घेतली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासलामधील लीड सोडता इतर ठिकाणच्या मतदारसंघात सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. तर सुप्रिया सुळेंनी लीड काय राखत तब्बल ११ हजार ५३२ मतांची आघाडी घेतली. सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून ३ हजार ४९४, इंदापूरमधून १ हजार ४९१, दौंडमधून ५२४, पुरंदरमधून १६२, भोरमधून ३६९ मतांची आघाडी घेतली आहे.

बारामतीत तिसऱ्या फेरीत सुप्रिया सुळे यांना २ हजार ५६४ मतांची आघाडी. एकूण तीन फेऱ्यानंतर सुप्रिया सुळे यांना १४ हजार ७३ मतांची आघाडी मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांना भोर आणि खडकवासला मतदारसंघांमध्ये आघाडी मिळत आहे.

 बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले. ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच मुलीसाठी मैदानात उतरले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण पक्षाची नव्याने बांधणी केली. यामध्ये पवार यांनी जुन्या सवंगड्यांना बरोबर घेत नव्याने राजकीय पदासह निवडणुकीची जबाबदारी दिली. संपूर्ण निवडणुकीची सूत्रे हाती घेत मतदारसंघ पिंजून काढला. कोणताही अनुभव नसलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी प्रथमच राजकीय रिंगणात उतरविले; तसेच पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, तसेच सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या प्रथमच प्रचारात सहभागी झाल्या. दुसरीकडे अजित पवार यांचे बारामतीच्या सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँकांवर वर्चस्व आहे. या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या मतदानासाठी विभागून जबाबदाऱ्या घेतल्या. या सर्वांवर अजित पवार स्वत: लक्ष ठेवून होते.

टॅग्स :big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Sunetra Pawarसुनेत्रा पवारSupriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४