शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंविरुद्धची लढत आव्हानात्मक?; बारामतीतून उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवार म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 20:15 IST

बारामतीतून उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांचं सुळेंना आव्हान; म्हणाल्या...

NCP Sunetra Pawar ( Marathi News ) : राज्यातील बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातून अखेर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार, हे आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. महाविकास आघाडीकडून बारामतीसाठीसुप्रिया सुळे यांच्या नावाचीही आजच अधिकृतरित्या घोषणा झाली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारीची घोषणा होताच सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच सुप्रिया सुळेंनाही आव्हान दिलं आहे.

सुनील तटकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस आहे. कारण आज महायुतीच्या माध्यमातून मला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मला ही संधी दिली त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे महादेव जानकर या सर्वांचेच आभार मानते," असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंबाबत काय म्हणाल्या?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे यांच्या आव्हानाविषयी प्रश्न विचारताच सुनेत्रा पवार यांनी म्हटलं की, "ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. त्यामुळे ही जनतेची लढत आहे," असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या रुपाने महायुतीत बंडाळी निर्माण झाली होती. शिवतारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात महायुतीच्या सर्व नेत्यांना यश आले आणि आज दुपारीच पत्रकार परिषद घेत विजय शिवतारेंनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. तसंच आपण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचंही शिवतारे यांनी सांगितलं. त्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४