शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Baramati Lockdown : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत व्यापारी वर्गाचा 'एल्गार' ; सोमवारपासून दुकाने नियमितपणे उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:27 PM

Coronavirus Baramati: बारामतीतील ब्रेक द चेन अंतर्गत ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याला व्यापारी वर्गाचा तीव्र विरोध....

बारामती: बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फॅम इत्यादी यांच्या सूचनेनुसार बारामती व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्य संघटनांनी राज्य शासनाने पुकारलेल्या पुढील २ दिवस शनिवार व रविवार च्या कडकडीत बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र, सोमवार (दि १२) पासुन दुकाने उघडण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आदी हद्दींमध्ये ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्याचा आदेश देण्यात आला .त्यानंतर स्थानिक प्रशासनाने अत्यावश्याक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अचानक व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांना धक्का बसला.या निर्णयामुळे व्यापारी नाराज होते.अखेर शुक्रवारी (दि ९) झालेल्या बैठकीत दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या कालावधीत उघडावीत. यावेळी सरकारने दिलेल्या कोव्हिडं १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कर्मचारी व ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे.

बैठकीसाठी अध्यक्ष नरेंद्र गुजराती,  उद्योगपती सचिन सातव, सुशील सोमाणी, स्वप्निल मुथा, प्रवीण गांधी, चेतन व्होरा, अभय गादीया, संजय सोमाणी, बाळू चांदगुडे, सुधीर वाडेकर, परेश वीरकर, नरेंद्र मोता, शैलेश साळुंखे, सुरेंद्र मुथा, फकृशेत भोरी, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, प्रमोद खटावकर, किरण गांधी  आदी उपस्थित होते. ————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या