शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:15 IST

Santosh Deshmukh Murder Morcha: स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.

बारामती स्व. संतोष देशमुख यांच्या निघून हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बारामतीत शनिवारी (दि ८) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा रविवारी (दि ९) होणार आहे.यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.बारामती शहरात शनिवारी(दि ८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.मराठा समाजाने या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी मोर्चाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी बारामती बंद आणि सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्व. संतोष देशमुख यांचा महिना (श्रद्धांजलीचा दिवस) हा ८ मार्च रोजी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना या मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांच्या भावना विचारात घेऊन आणि त्यांना या आंदोलनात सामील होता यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा आयोजित निषेध मोर्चा रविवारी (दि ९) आयोजित करण्यात आला आहे.या मोचमिध्ये स्व. संतोष देशमुख यांचे बंधु, मुलगी आणि इतर कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत. हा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मोर्चा सुरु होणार आहे.कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होइल.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दु:ख झालेले सर्व जाती धर्माचे नागरीक मोर्चात सहभागी होतील.मोर्चा नेहमीच्या मार्गाने भिगवण चाैक येथे दाखल होईल.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBaramatiबारामतीBeedबीडmarathaमराठा