शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

बारामतीत हेल्मेटसक्तीचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:44 IST

बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि. २४ ) पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला.

बारामती : बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि. २४ ) पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांसह सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध आजपासून कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, कार्यालयावर फ्लार्इंग स्कॉड इतरत्र गेल्याने आज करण्यात येणारी कारवाई रद्द करण्याची नामुष्कीची वेळ ओढवली. आता सोमवार (दि. २८ ) पासून ही कारवाई करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.बारामती विभागांतर्गत येणाºया बारामती, दौंड, इंदापूर शहर तालुक्यात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. याबाबत खुद्द उपपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार या कारवाईमध्ये दोषी वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्याचा इशारा दिला होता. शिवाय, दोषी वाहनचालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन तासांच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार असल्याचेदेखील सांगण्यात आले होते.अन्यथा, वाहनचालकांविरोधात चालविण्यात येणारा खटला निकालात न काढण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.शिवाय, हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणाºया व्यक्तीसह मागे बसलेल्या व्यक्तीसाठी देखील लागू राहणार आहे. त्यामुळे आज बारामती उपविभागात विशेषत दुचाकीस्वारांनी हेल्मेटसक्तीचा सर्वानी धसका घेतला होता. गुरुवारी (दि. २४) आठवडे बाजार असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक जणांनी शहरात दबकतच प्रवेश केला.मात्र, कारवाईचा कोठेही मागमूस न आढळल्याने हेल्मेटसक्ती कारवाई करण्यासाठी प्रशासन नरमल्याची चर्चा सुरू झाली. सकाळी १० नंतर तर कोठेही कारवाई न दिसल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु झाली.यामध्ये बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न करता, कारमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ‘फ्लार्इंग स्कॉड’ ला पुणे येथे बोलविण्यात आले आहे.पुणे शहरातील अवैध बस वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी बारामतीसह, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकलूज येथील स्कॉडला देखीलबोलविण्यातआलेआहे.पुढीलचार दिवसपुणे शहरातती कारवाईसुरुराहणार आहे.>...लाखो वाहनचालकांसाठी केवळदोन वाहन निरीक्षकांचे ‘फ्लार्इंग स्कॉड’बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड तालुक्याचा समावेश आहे. हेल्मेट वापरासह कारमध्ये सीटबेल्ट वापर न करणाºया वाहनचालकांवर या कार्यालयाच्या ‘फ्लार्इंग स्कॉड’मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या स्कॉडमध्ये अवघ्या दोन वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. या निरीक्षकांसह, कार्यालयासाठीदेखील केवळ एकच वाहन आहे. त्यामुळे तीन तालुक्यांतील लाखोंच्या संख्येत असणाºया वाहनचालकांसाठी केवळ दोन वाहन निरीक्षक कारवाई कशी करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे कारवाई सुरू झाली तरी, अधिकारी, कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे कारवाईचा पुन्हा फज्जाच उडण्याची चिन्हे आहेत.>बारामती विभागात हेल्मेट सक्तीचा मनुष्यबळाअभावी पूर्णपणे फज्जा उडाल्याचेदिसून बारामतीत गुरुवारी कारवाई होऊ शकली नाही. सोमवारी (दि. २८) पासून ही कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचीदेखील मदत घेण्यात येईल.