शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

बारामतीत निर्भया पथकातील महिला पोलिसाला मारहाण, मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 01:35 IST

बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसालाच एकाने मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला.

बारामती/सांगवी : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसालाच एकाने मारहाण करून दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २२) सकाळी घडला. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. मुलींची सुरक्षा करणाऱ्या पथकावरच ही वेळ आल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पेट्रोलिंगसाठी गेलेल्या निर्भया पथकाच्या महिला पोलीस व पोलीस जमादार चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत आरोपी विजय गोफणे (रा. वंजारवाडी, ता. बारामती) याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा रस्ताच आरोपी विजय गोफणे याने रस्त्यातच मुले सोबत घेऊन दुचाकीवर बसून अडविला होता. यामुळे निर्भया पथकाच्या महिला पोलिसांनी ‘रस्त्यात असे थांबू नका’ म्हणून ‘परवाना आहे का?’ अशी विचारपूस केली. यावर त्याने महिला पोलिसांनाच उलटसुलट भाषा वापरून, शिवीगाळ, दमदाटी केली. महिला पोलिसाचा हात पिरगळला व कानाखाली मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलीस जमादार सोडविण्यासाठी मध्ये आल्या. या वेळी आरोपीने त्यांच्याही डोक्यात दोन फाईट मारल्याने डोक्यात जबर मार बसला. या वेळी पोलीस पाठलाग करीत असताना आरोपी गोफणे तेथून फरार झाला. एवढा गंभीर प्रकार घडत असतानादेखील इतरांनी बघ्याची भूमिका घेतली. गंभीर स्वरूपाचा गुन्हा करूनही आरोपीच्या नातेवाइकांची प्रकरण मिटविण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात धावपळ उडाली होती. विद्या प्रतिष्ठान येथे शेजारील गावातील मोकाट मुलांचा वावर वाढला आहे. बारामतीत गुंड प्रवृत्तीला आजही जरब बसेनासे झाले आहे. महिला पोलिसांवरही हात उचलण्यापर्यंत आता या गुंडांचीमजल गेली आहे....निर्भया पथकात महिलापोलिसांचे बळ वाढविण्याची गरजनिर्भया पथकात महिला पोलिसांचे संख्याबळ वाढवून पुरुषांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. सध्या बारामती व इंदापूर या तालुक्यांत एक महिला अधिकारी, एक पुरुष अधिकारी तर तीन महिला पोलीस कार्यरत आहेत. तरीही दोन्ही तालुके, त्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या शाळा, महाविद्यालय परिसर मोठ्या मुश्किलीने सांभाळत आहेत. यामुळे घडलेल्या प्रकरणाची जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दखल घेऊन निर्भया पथकात संख्याबळ वाढवून विशेष पथक नेमण्याची गरज आहे.विशेष पथक कधी नेमणार..?निर्भया पथकाबरोबरच विशेष पथकनेमणार असल्याचे झारगडवाडीच्या प्रकरणानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र, अद्यापही या विशेष पथकाची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही.तसेच, दामिनी पथक नक्की अस्तित्वात आहे का? याची माहिती मिळणे आवश्यक आहे. बीट मार्शलच्या दिलेल्या दुचाकीचा कुठेही वापर होताना दिसत नाही.संबंधित आरोपींवर लगेच महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. दहा दिवसांत ही कारवाई केली जाणार असल्याचे या वेळी पाटील यांनी स्पष्ट केले.- संदीप पाटील,ग्रामीण पोलीस अधीक्षकगेल्या दोन वर्षांत बारामती विभागाच्या निर्भया पथकाने बारामती व इंदापूर या तालुक्यांत १,४०० हून अधिक रोडरोमिओंवर धडक कारवाई केली आहे. निर्भया पथकाच्या कारवाईच्या धडाक्यामुळे रोडरोमिंओंवर चांगली जरब बसली आहे. त्याची दखल घेऊन निर्भया पथकाला पुणे जिल्ह्यात सर्वोतम कामगिरीबाबत प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मात्र आज घडलेल्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे