Baramati bypoll Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४७ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:50 IST2026-04-08T19:49:49+5:302026-04-08T19:50:30+5:30
Baramati bypoll Election: अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ६) ५५ उमेदवारांकडून ६८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५३ अर्ज वैध ठरले.

Baramati bypoll Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ४७ उमेदवार रिंगणात
बारामती - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी ६ जणांनी बुधवारी (दि. ८) माघार घेतली. त्यामुळे ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ६) ५५ उमेदवारांकडून ६८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५३ अर्ज वैध ठरले. यामध्ये सहा जणांनी आज माघार घेतली. गुरुवारी (दि. ९) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह काँग्रेसचे आकाश मोरे यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे.