शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

शेतीच्या जागतिक दर्जा स्टार्टअप्ससाठी बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 8:46 PM

शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.

ठळक मुद्देनीती आयोगाची घोषणा, जगातील शास्त्रज्ञांचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारनीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर

बारामती : शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी देशात एकमेव बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड नीती आयोगाने केली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत सन २०१७-१८ साठी भारतातील ७२ सेंटरची घोषणा शुक्रवारी (दि. ४) निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यकारी संचालक रमणन रामानाथन यांनी केली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शेतकरी ते कृषिउद्योजक वाटचाल सहजपणे होणार आहे. शेतकऱ्यांची उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या निर्णयामुळे पहिले पाऊल पडले आहे. जगातील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होईल.आयोगाच्या घोषणेमुळे हे महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे उद्योगामध्ये रुपांतरित करणारे जागतिक दर्जाचे  केंद्र बनणार आहे. ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी व स्वच्छतेत आयोगास देशभरात १०० जागतिक दर्जाची केंद्रे उभारायची आहेत. त्यामधील ७२ केंद्रांची निवड निती आयोगाच्या निवड समितीने केली. या केंद्रांमध्ये आता अटल इनक्युबेशन सेंटर्स उभारली जाणार आहेत. यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आसाम विद्यापीठ व बारामतीचे कृषी महाविद्यालय या दोन संस्थांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, देशात शेतीच्या बाबतीत महाविद्यालय म्हणून एकट्या बारामतीचा समावेश आहे. नीती आयोगाच्या सेंटरसाठी देशातून २६७६ पात्र संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते.    हे सेंटर जागतिक दर्जाच्या संशोधन केंद्राशी संलग्न राहील. नीती आयोगाच्या निवड समितीसमोर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी या नियोजित केंद्रासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादरीकरण केले. आता या नव्या सेंटरमध्ये महाविद्यालयातील प्रा. जया तिवारी, प्रा. सोनाली सस्ते, प्रा. श्रीकांत कर्णेवार, प्रा. अमित काळे, प्रा. दादा पाटील व प्रा. चंद्रशेखर शेंडे हे प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.————-——————————————आमची जबाबदारी आता अधिक वाढली : पवारनीती आयोगाने देशातील एकमेव कृषी महाविद्यालयाची दखल घेतली. यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. महाविद्यालयात उभारले जाणारे सेंटर शेती व शेतीपूरक व्यवसायात, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात, शेतीपूरक व्यवसायाची गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असे बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सांगितले.——————

टॅग्स :Baramatiबारामतीagricultureशेती