शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवर दारू न दिल्याने बार मालकावर कोयत्याने वार; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 15:04 IST

बार मालकाच्या डोक्यावर, हातावर व पोटावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले

धायरी : उधारीवर दारु देण्यास नकार दिल्याने गुंडांच्या टोळक्याने बार मालकाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरण्णा शिवण्णा तावरखेड (वय ४०, रा. मुक्तांगण हाईट, नर्‍हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सराईत गुंड श्रीकांत थोपटे (वय: ३५) व इतर ५ ते ६ गुंडावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सिंहगड रस्ता परिसरातील नर्‍हे येथील लक्ष्मी बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तावरखेड यांच्या मालकीचे लक्ष्मी बार अँड रेस्टॉरंट आहे. गुरुवारी रात्री श्रीकांत थोपटे व त्यांच्या साथीदारांनी उधारीवर दारु मागितली होती. त्याला बार मालकाने नकार दिला होता. हा राग मनात ठेवून थोपटे व त्याचे साथीदार शुक्रवारी रात्री कारमधून आले. त्यांनी बार मालकाच्या डोक्यावर, हातावर व पोटावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या ग्राहकांना शिवीगाळ करुन कोयते हवेत फिरवून आरडा ओरडा केला. त्यानंतर रस्त्यावर येऊन आजू बाजूच्या दुकानदारांना श्रीकांतभाई आला आहे, बघताय काय पळा दुकाने बंद करा नाही तर एक एकाला आज जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करीत आहेत. 

टॅग्स :DhayariधायरीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस