शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'बाप्पाचा' उत्सव यंदा होणार साधेपणाने साजरा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:25 IST

शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल.

ठळक मुद्देमानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फसरींग मिटींग निर्णयपूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशिर्ष, आरती असे सर्व धार्मिकविधी होणार धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रोषणाईला फाटा

पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय, बुधवारी झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फसरींग मिटींग मध्ये घेण्यात आला.यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशिर्ष, आरती असे सर्व धार्मिकविधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.बैठकीला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी, राजू परदेशी, श्री पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी उपस्थित होते....................................*गणरायाला मास्क नको या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूतीर्कारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असे करू नये. अशी सूचना मंडळांना देण्यात आली.............दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रोषणाईला फाटादरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची भव्यदिव्य रोषणाई असते़ ही सजावट करण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो़ परंतु, अजून लॉकडाऊन सुरू आहे़ तो अजून वाढेल की नाही हे आता सांगता येत नाही़ कदाचित पाचवा लॉकडाऊनसुद्धा असू शकेल़ आमची दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस सजावटीची तयारी सुरु होते़ त्यामुळे या वेळी मोठी सजावट, रोषणाई नसेल, अत्यंत साधेपणाने व डामडौल न करता परंपरा पाळण्यासाठी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.तसेच गणरायासमोर ऋषिपंचमीला सुमारे २५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले जाते़ मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेता व आताची परिस्थिती पाहून केवळ काही महिलांच्या हस्ते प्रतीकात्मक अथर्वशीर्ष पठण घेण्याचा विचार सुरु आहे़ त्या वेळी महिलांची काय भूमिका असेल, यावर किती महिलांना बोलवायचे हे ठरविण्यात येईल़ अशोक गोडसे, अध्यक्ष,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट 

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका