शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:23 IST

बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निश्चित केलेले २०४७ चे विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला मोठे योगदान द्यावे लागेल. आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरण शाश्वतता आणि उत्तम प्रशासन हे विकसित भारताचे महत्त्वाचे घटक आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँका आपल्या माध्यमातून गती देऊ शकतील, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी व्यक्त केले. पुण्यात स्थापन झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना उपस्थित होते.

सीतारामन म्हणाल्या, पायाभूत सुविधांचा विकास व विस्तार, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) गरजेनुसार वित्तपुरवठा करणे, अद्यापही बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांनाही बँकिंगच्या जाळ्यात आणणे आणि सर्व नागरिकांना विमा कवच पुरवण्यावर भर देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेचे चित्र बदलत आहे. याद्वारे ग्राहकांना सुरक्षित, सुलभ डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळत आहे. या यंत्रणा अधिक भक्कम व सुलभ आणि विश्वसनीय बनविणे गरजेचे आहे. मात्र, असे करतानाच बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुरेशी भक्कम सुरक्षाप्रणाली विकसित करायला हवी. डिजिटल यंत्रणेवरील हल्ल्यासारखे प्रसंग घडल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे, याचा सरावही बँकांनी करणे आवश्यक आहे.

बँकांनी ग्राहककेंद्रित यंत्रणा आणि प्रणाली विकसित करून ग्राहकांना अधिकाधिक समाधान मिळावे, यावर भर द्यावा, तसेच भविष्यातील विकासासाठी आवश्यक गरजा लक्षात घेता बँकांनी भांडवलवृद्धी करण्यावर भर द्यावा, असे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी सांगितले.येत्या पाच वर्षांत आणखी एक हजार शाखा सुरू करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. ग्राहकाभिमुख सेवा नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा यावर बँकेचा भर राहील, असे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbankबँकNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMONEYपैसाInvestmentगुंतवणूकdigitalडिजिटल