भिंतीला भगदाड पाडून बँकेत चोरीचा डाव, पाठलाग करताना पोलिस जखमी, संशयिताना घेतले ताब्यात
By नारायण बडगुजर | Updated: July 9, 2023 08:25 IST2023-07-09T08:24:28+5:302023-07-09T08:25:23+5:30
Pimpri Chinchwad: भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. डांगे चौक येथील फेड बॅंकेत रविवारी (दि. ९) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

भिंतीला भगदाड पाडून बँकेत चोरीचा डाव, पाठलाग करताना पोलिस जखमी, संशयिताना घेतले ताब्यात
- नारायण बडगुजर
पिंपरी - भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. डांगे चौक येथील फेड बॅंकेत रविवारी (दि. ९) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील मयुरेश्वर मंदिराजवळ 'फेड' बँक आहे. बॅंकेच्या शेजारी असलेल्या गाळ्याचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गाळ्याच्या भिंतीला भगदाड पडून चोरटे बँकेत घुसण्याचा प्रयत्न असताना बाजूच्या एका कामगाराने आपल्या मालकाला फोनवर याबाबत माहिती दिली. मालकाने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना कळविले. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका पोलिसाने देखील त्यांचा पाठलाग करीत पत्र्यावर उडी मारून एका चोरट्याला ताब्यात घेतले. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला दुखापत झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वाकड पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत.