शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बँक फ्रॉड प्रकरण: हैदराबादहून दोघांना अटक; १३ जणांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 20:08 IST

नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी हैदराबादहून आणखी दोघांना अटक केली

पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी हैदराबादहून आणखी दोघांना अटक केली. दरम्यान, ज्याच्या घरासमोर पोलिसांनी २५ लाखांसह तिघांना पकडले होते. तो सुधीर भटेवरा हा फरार झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

लक्ष्मीनारायण गुट्टू ऊर्फ सोन्या (वय ३२, रा. बौद्धनगर, हैदराबाद) आणि व्यंकटेश सुब्रम्हण्यम उपाला (वय ४०, रा. भांदलागुंडा, नागोल, हैदराबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी अनघा मोडक हिच्या मोबाईल फोनच्या माहितीचे एक्सट्रॅक्शन केले असता त्यातील संभाषणामध्ये सर्व आरोपींचा उल्लेख व त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आढळून आले आहे. रोहन मंकणी, राजेश शर्मा, परमजितसिंग संधु आणि अनघा मोडक हे सर्व जण १० व १२ मार्च रोजी नवी पेठेतील सॅफरॉन हॉटेलमध्ये एकत्र आले होते. त्यांनी तेथे बराच वेळ थांबून चर्चा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यायची आहे. अनघा मोडक हिच्या घराची तसेच ऑफीसची झडती घेतली असून दोन्ही ठिकाणावरुन ७ हार्ड डिस्क व एक टॅब जप्त करण्यात आला आहे. या लॅपटॉपचा तिने गुन्ह्यासाठी वापर केला आहे का याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यात एका बँकेतील एक खाते व दुसर्‍या बँकेतील ३ खात्यांची माहिती संबधित बँकेने सादर केली असून त्या खात्यांमध्ये २०९ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यातील पैसे आरोपी हे कोणत्या प्रकारे हॅक करुन त्यातील रक्कम ही एका बँक खात्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या खात्यावर कशा प्रकारे ट्रांन्सफर करणार होते, याचा तपास करायचा आहे.

रवींद्र माशाळकर यांच्या लातूर येथील घराची झडती घेण्यात आली असून घरातून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. हैदराबाद येथील आरोपी इतरांशी कशाप्रकारे संपर्कात होते, याचा तपास करायचा आहे. लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममीडी (रा. हैदराबाद) यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर २५ कोटी ७७ लाख ७८ हजार ९०८ रुपये तसेच दुसर्‍या व्हॉटसअ‍ॅपवर ३ कोटी ५ लाख ६० हजार ३५५ रुपयांची किंमतीची शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती पाठविल्याचे मिळून आले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे़, अशी माहिती सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने सर्वांना अधिक तपासासाठी २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ......३ खात्यात २०९ कोटीची माहिती समोरगुट्टूने राजशेखरला पाठविली होती २५ कोटी ७७ लाख व ३ कोटी ५ लाख रुपये शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती........सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. आनंदनगर, सिंहगड रोड) याला पोलिसांनी पकडल्यानंतर नोटीस देऊन परत पाठविले होते. मात्र, आता पोलीस त्याच्याकडे चौकशीसाठी गेले असताना तो घरी मिळून आला नाही़ तो पळून गेल्याने पोलिसांनी तो फरार असल्याचे न्यायालयात सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीArrestअटक