शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 1:21 PM

याअपघातात मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कार्यरत होते.

बारामती: बारामती मोरगाव रस्त्यावर पुलाच्या गार्ड स्टोनला  धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. संतोष दशरथ कांबळे (वय ३८, रा. पंचशीलनगर, कसबा, बारामती) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी (दि. ३) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोरगावजवळ खटकळीचा ओढा येथे घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कांबळे हे कार्यरत आहेत. बँकेत जाण्यासाठी निघालेले असताना त्यांची दुचाकी  मोरगाव - निरा रस्त्यावर पुलाच्या गार्ड स्टोनला धडकली. या अपघातात ते बाजूला फेकल्याने ते गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ त्या ठीकाणी पोहचले. वडगावचे पोलिस उपनिरीक्षक राजाराम साळुंके, हवालदार संजय मोहिते, माजी सरपंच पोपटराव तावरे, दादा नेवसे आदींनी त्यांना उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. बँक कर्मचारी कांबळे लोकमतचे दिवंगत वरिष्ठ उपसंपादक महेंद्र कांबळे यांचे कनिष्ठ बंधू होते. 

टॅग्स :BaramatiबारामतीICICI Bankआयसीआयसीआय बँकDeathमृत्यूAccidentअपघात