मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 13:23 IST2020-04-03T13:21:42+5:302020-04-03T13:23:56+5:30
याअपघातात मृत्युमुखी पडलेले दुचाकीस्वार आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कार्यरत होते.

मोरगाव रस्त्यावर गार्ड स्टोनला धडकल्याने दुचाकीचा अपघात; बँक कर्मचारी जागीच ठार
बारामती: बारामती मोरगाव रस्त्यावर पुलाच्या गार्ड स्टोनला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला. संतोष दशरथ कांबळे (वय ३८, रा. पंचशीलनगर, कसबा, बारामती) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी (दि. ३) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोरगावजवळ खटकळीचा ओढा येथे घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या मुर्टी शाखेत कांबळे हे कार्यरत आहेत. बँकेत जाण्यासाठी निघालेले असताना त्यांची दुचाकी मोरगाव - निरा रस्त्यावर पुलाच्या गार्ड स्टोनला धडकली. या अपघातात ते बाजूला फेकल्याने ते गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ त्या ठीकाणी पोहचले. वडगावचे पोलिस उपनिरीक्षक राजाराम साळुंके, हवालदार संजय मोहिते, माजी सरपंच पोपटराव तावरे, दादा नेवसे आदींनी त्यांना उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. बँक कर्मचारी कांबळे लोकमतचे दिवंगत वरिष्ठ उपसंपादक महेंद्र कांबळे यांचे कनिष्ठ बंधू होते.