शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यातील रहिवाशांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:41 IST

मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील कसबा पेठ स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देमेट्रो स्थानक बाधित कुटुंबे: पालकमंत्री दुर्लक्ष करत असल्याची टीका

पुणे: मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गातील कसबा पेठ स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दिला. गरज नसताना कसबा पेठेत भुयारी स्थानक तयार करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूण २४८ कुटुंबे बाधीत होत असून त्याशिवाय ६ धार्मिक स्थळेही बाधित होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कसब्यातील या भुयारी स्थानकामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांनी कसबा पेठ रहिवासी नियोजित मेट्रो स्थानक विरोधी संघ स्थापन केला आहे. या संघाचे अमित शिंदे यांनी निवेदन प्रसिद्ध करून आंदोलनाचा तसेच मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. हे नियोजित भुयारी स्थानक बुधवार पेठेत होते. तेथून ते कारण नसताना कसबा पेठेत प्रस्तावित करण्यात आले. भूयारी स्थानकातून वर येण्यासाठी लागणाऱ्या जागेमुळे २४८ घरे बाधीत होत आहेत. ६ धार्मिक स्थळांचे पण स्थलांतर करावे लागणार आहे.याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच पालकमंत्री, मेट्रो कंपनी यांना निवेदन देण्यात आले, मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. तीन वेळा निवेदन दिले, मात्र एकदाही साधी चचार्सुद्धा केलेली नाही.गरज नसताना जुन्या रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हलवले जात आहे. त्यांचे पुनर्वसन त्यांना हवे तसे करणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात काहीच चर्चा केली जात नाही. कसबा पेठ हा पालकमंत्री गिरीश बापट यांचा विधानसभा मतदारसंघ आहे तरीही ते या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत असे शिंदे यांचे म्हणणे आहे.  स्थानक रद्द होत नाही तोपर्यंत रहिवासी आंदोलन करत राहतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.   

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटMetroमेट्रोLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान