शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पालिकेत नागरिक-ठेकेदारांना महिनाभर बंदी करा; महापौरांचे आयुक्तांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:38 IST

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकाच हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता निर्माण

ठळक मुद्देपालिकेत दैनंदिन कामकाजाकरिता नागरिक आणि ठेकेदारांचे येणे वाढले

पुणे : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून पालिकेत दैनंदिन कामकाजाकरिता नागरिक आणि ठेकेदारांचे येणे वाढले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता पालिकेत येण्यास नागरिक, ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना महिनाभरासाठी मनाई करण्यात यावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.शहरातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा १२ हजारांच्या घरात गेला आहे. दिवसागणिक होणारी वाढ ही सरासरी ३५० ते ४०० च्या दरम्यान आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ३० जूनपर्यंत पालिकेच्या कार्यालयात येणारे नागरिक, ठेकेदार व इतर नागरिकांना प्रवेश निषिद्ध केला आहे. तसेच नगरसेवकांसोबत एकावेळी फक्त एकच नागरिक असावा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.तसेच महानगरपालिका सेवा आणि कामकाजासंबंधी नगरसेवकांच्या सूचना, प्रस्ताव अथवा निवेदन असल्यास दुरध्वनी, ई-मेल व व्हॉटस्अपचा जास्तीत जास्त वापर करण्याचाही सूचना दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील 'कोरोना' विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्येत होत असेली वाढ तसेच महापालिका कार्यालयांतील कर्तव्यावरील कर्मचारी-अधिकारी तसेच नगरसेवकदेखील कोरोनाबाधित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिक, ठेकेदार, कार्यकर्ते यांना येण्यास मनाई करावी. कारण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पालिकेच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. नगरसेवक कामानिमित्त पालिकेत येणार असतील तर त्यांच्यासोबत केवळ एकच कार्यकर्ता यावा असे आदेश देण्याची सूचना महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. महापौरांच्या या मागणीवर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामMayorमहापौरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्त