शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे हे गोरगरिबांची ऊर्जाशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

इंदापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे गोरगरीब, उपेक्षित, कष्टकरी या सर्वांची ऊर्जा व शक्ती होती. आजही ती शक्ती कायम ...

इंदापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे गोरगरीब, उपेक्षित, कष्टकरी या सर्वांची ऊर्जा व शक्ती होती. आजही ती शक्ती कायम टिकून आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

स्वाभिमान युवा संमेलन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. २३) इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी येथे शिवसंग्राम व्याख्यानमालेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर वकील बार असोसिएशन अध्यक्ष अँँड. प्रमोद खरात होते.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, असंख्य गोरगरीब कुटुंबांतील लोकांना आधार देण्याची भूमिका, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायमस्वरूपी टिकवली. त्यामुळेेच महाविकास आघाडीचे सरकार आज जनतेची सेवा करते आहे. इंदापूर तालुक्यांमध्ये अनेक वर्षापासून, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. यातून खऱ्या अर्थाने युवाशक्तीला प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.

व्याख्याते भास्करराव पेरे-पाटील यांनी "माझी ग्रामपंचायत, माझी जबाबदारी" या विषयावर प्रबोधन केले. ते म्हणाले, आपल्याजवळील अगदी थोडे दुसऱ्याला देण्याची भूमिका ठेवा. तरच गावात सुखसमाधान व आनंद बघता येईल. गावची स्वच्छता, वृक्षारोपण व गावचे आरोग्य याची काळजी गावकऱ्यांनी, कोणाचाही एक रुपया न घेता करता येते. त्यामुळे कोण काही देईल हे न पाहता आपले गाव आपले कुटुंब असा विचार करून, गावासाठी थोडा वेळ द्या,असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आयोजक अँड. नितीन कदम यांनी केले.

२५इंदापूर

शिरसटवाडी व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.