शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् स्वरराज ठाकरे झाले राज ठाकरे; राज यांनीच सांगितली दुसऱ्या बारशाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 11:27 IST

दुसऱ्या बारशाची गोष्ट ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

पुणे: माझं आधीचं नाव स्वरराज होतं. मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नावाची गंमत सांगितली. माझे वडील संगीतकार होते. त्यामुळे मुलगा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र मला वेगळेच 'राग' येऊ लागले, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या स्वरराज करंडक स्पर्धेला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी तरुणाशी संवाद साधला.स्वरराज ठाकरे नंतर राज ठाकरे कसे झाले, याची आठवण मनसेच्या अध्यक्षांनी स्वरराज करंडक स्पर्धेत सांगितली. 'मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. वडील संगीतकार असल्यानं मुलगादेखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं. मात्र अजूनही स्वरराज हेच नाव माझ्या पासपोर्टवर आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितली.आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. 'मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझ्या नावाचं बारसं झालं,' अशी आठवण राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली. माझ्या घरात सर्वांची नावं संगीतातल्या विविध रागांवरुनच ठेवण्यात आली आहेत, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 'माझ्या आईचं नाव मधुवंती आहे. तर बहिणीचं नाव जयजयवंती आहे. त्यामुळे माझं स्वरराज ठेवलं. मुलगा संगीतात कारकीर्द करेल, असं कुटुंबीयांनी वाटलं होतं. पण त्या रागाचं पुढे काहीच झालं नाही,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे