बाळासाहेब खिलारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:37 IST2018-08-28T23:37:32+5:302018-08-28T23:37:46+5:30

Balasaheb Khilari passed away | बाळासाहेब खिलारी यांचे निधन

बाळासाहेब खिलारी यांचे निधन

जुन्नर : येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी (वय ७४) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांनी जन्मभूमी आदिवासी भागातील शिंदे गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, खरेदी-विक्री संघ संचालक, कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अशी राजकीय, सहकार क्षेत्रात पदे भूषविली.

जिल्हा दूध उत्पादक जुन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून ते २३ वर्षे कार्यरत होते. जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री शिवाजी मराठा शिक्षण सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी अखेरपर्यंत भूषविले. मुंबई
येथील व्यवसायिक राजेंद्र खिलारी व विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी यांचे ते वडील होत.

Web Title: Balasaheb Khilari passed away