शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

जि. प.कडून मुद्रांक शुल्क वाढल्याने 'पीएमआरडीए' च्या तिजोरीत पडणार भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 17:51 IST

प्राधिकरणाच्या स्वत:च्या उत्पन्नात विनासायास ४० कोटींनी वाढ होणार

ठळक मुद्दे प्राधिकरणास २४ डिसेंबर, २०१८ पासूनचे विहित टक्केवारीतील मुद्रांक शुल्क अदा केले जाणार

नीलेश राऊत- पुणे : केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर आपले वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) आता आपल्या हक्काचा निधी मिळणार आहे़. ग्रामपंचायतक्षेत्रात नोंदविलेल्या दस्तांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्कापैकी २५ टक्के रक्कम प्राधिकरणास देण्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे़. यामुळे प्राधिकरणाच्या स्वत:च्या उत्पन्नात विनासायास ४० कोटींनी वाढ होईल. पुणे महानगरमध्ये नावीन्यपूर्ण पद्धतीने विकास आराखडा तयार करून विकासाला दिशा देण्यासाठी, सन २०१५-१६ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाली़. या प्राधिकरणाच्या हद्दीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतची ८१६ गावे समाविष्ट असून, या गावांमधील जमीन व मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातील दस्त नोंदविताना मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कापैकी काही रक्कम प्राधिकरणास देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते़. या प्रस्तावास २५ नाव्हेंबर, २०१९  रोजी राज्य शासनाने अंतिम मंजुरी दिली़. यामुळे प्राधिकरणास २४ डिसेंबर, २०१८ पासूनचे विहित टक्केवारीतील मुद्रांक शुल्क अदा केले जाणार आहे़. ग्रामपंचायत क्षेत्रात नोंदविण्यात येणाऱ्या दस्तांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या १ टक्के अतिरिक्त मुद्रांक शुल्काच्या रकमेपैकी ५० टक्के जिल्हा परिषदेस व उर्वरित ५० टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीस देय होती़. आता नवीन धोरणानुसार पीएमआरडीएच्या हद्दीतील ग्रामपंचायतक्षेत्रातील दस्तांसाठी, जमा झालेल्या जिल्हा परिषद मुद्रांक शुल्कातील २५ टक्के रक्कम प्राधिकरणास दिली जाणार आहे़. पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत १ हजार ९०० गावे असून, यापैकी ४५ टक्के म्हणजेच ८१६ गावे ही प्राधिकरणाच्याही हद्दीत येत आहेत़.  सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला १ टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्कापोटी २५१ कोटी रुपये मिळाले होते़.  

प्राधिकरणास आजपर्यंत हद्दीतील बांधकाम परवानगीपोटीच दरवर्षी साधारणत: ३०० कोटी रुपये प्राप्त होत होते़. त्यातच प्राधिकरणाच्या मालकीच्या जागा सध्या विकसनाकरिता तयार नसल्याने स्वत:च्या उत्पन्नाचे स्रोतही प्राधिकरणाकडे नव्हते़ ...स्थापनेपासून केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेल्या शिल्लक निधीतून प्राधिकरणाचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता़. पण आता या मुद्रांक शुल्कापोटी मिळणारा निधी हा प्राधिकरणाच्या आर्थिक जमेत भर घालणारा ठरला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएzpजिल्हा परिषदGovernmentसरकार